पोस्ट्स

मराठी व्याकरण भाग ६

मराठी व्याकरण भाग ६  * क्रियापद - वाक्याचा अर्थ पूर्ण करणा -या 'क्रियावाचक शब्दाला' क्रियापद असे म्हणतात. म्हणून 'करतो', 'शिकते', 'खेळतात',  ही क्रियापदे आहेत. क्रिया करणार कर्ता असतो व ज्याच्यावर क्रिया घडली त्याला कर्म असे म्हणतात.   उदा. दर्शन अभ्यास करतो वरील वाक्यात (करतो ) म्हणजे करण्याची क्रिया व्यक्त करण्यात आली आहे.  * धातुसाधिते- धातुला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणा -या  शब्दांना 'धातुसाधिते' किवा 'कृदन्ते' असे म्हणतात.  उदा.  १) ती पुस्तक वाचताना अचानक थांबली.   २) तो खेळतांना हसला.  वरील वाक़्यामध्ये 'खेळताना', 'वाचताना' ही धातुपासून तयार झालेली रुपे त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही, म्हणून त्याना क्रियापद म्हणत नसून धातुसाधिते म्हणतात.  * क्रियापदाचे प्रकार पुढील प्रमाणे -  सकर्मक क्रियापद- वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ज्या क्रियापदाला कर्माची गरज लागते, त्या क्रियापदाला 'सकर्मक क्रियापद' असे म्हणतात. उदा . कर्ता +कर्म +क्रियापद...

मराठी व्याकरण भाग ५

मराठी व्याकरण भाग ५ नमस्कार मित्रानो, स्वागत आहे आपले https://trytolearnineasy.blogspot.com/ मध्ये,  मागच्या भागात आपण 'सर्वनाम' या प्रकाराबाबत जाणून घेतले आजच्या भागात आपण 'विशेषण' या प्रकारा बाबत माहिती घेणार आहोत. विशेषण - नामाबद्दल विशेष माहिती सांगणा -या शब्दाला 'विशेषण' ('विशेष्य') असे म्हणतात. उदा. दर्शना गोड मुलगी आहे. वरील वाक्यात मुलगी बद्दल विशेष माहिती देण्यात आली आहे. मुलगी कशी? - गोड (मुलगी या नाम बद्दल विशेष माहिती.) * विशेषणाचे मुख्य प्रकार पुढील प्रमाणे- गुण  विशेषण - ज्या विशेषणांच्या योगाने नामाचा कोणताही प्रकारचा गुण अथवा विशेष दाखविला जातो , त्यास गुण 'विशेषण' असे म्हणतात. उदा. अलिबागला मोठे धरण आहे. वरील वाक्यात 'मोठे' या शब्दाने धरणाचा गुण सांगितला आहे. संख्या विशेषण- ज्या विशेषणाच्या  योगाने नामाची संख्या दर्शविली जाते , त्यास 'संख्या विशेषण' असे म्हणतात. उदा. जत्रेला पुष्कळ माणसे आली. वरील वाक्यात 'पुष्कळ' या शब्दाने माणसांची संख्या दर्शविली आहे. संख्या विशेषणा...

मराठी व्याकरण भाग ४

मराठी व्याकरण भाग ४ नमस्कार मित्रानो, आजच्या भागात आपण सर्वनाम या बाबत माहिती घेणार आहोत. * सर्वनाम- वाक्यात वारंवार होणारा नामाचा उच्चार टाळण्यासाठी ज्या विकारी शब्दाचा उपयोग केला जातो , त्याला 'सर्वनाम'  असे म्हणतात. मराठीत एकंदर नऊ सर्वनामे आहेत.  तू, मी, तो, हा, आपण, स्वतः, कोण, जो, काय.  सर्वनामाचे मुख्य सहा प्रकार आहेत.  १) पुरुषवाचक सर्वनाम  २) दर्शक सर्वनाम  ३) संबंधी सर्वनाम  ४) प्रश्नार्थक सर्वनाम  ५) सामान्य / अनिश्चित सर्वनाम  ६) आत्मवाचक सर्वनाम  १) पुरुषवाचक सर्वनाम-  बोलणा -याच्या किंवा लिहाणा-यांच्या दृष्टीने बोलणारा , ज्याच्याशी बोलायचे तो आणि ज्यांच्याविषयी बोलायचे तो असे तीन भाग पडतात. त्यालाच पुरुष म्हणतात व त्यांच्यासाठी वापरल्या जाणा -या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. पुरुषवाचक सर्वनामाचे तीन उपप्रकार पडतात.  पुरुषवाचक सर्वनामाचे उपप्रकार- अ) प्रथम पुरुष- मी, आम्ही, आपण, स्वतः इ. उदा. १) मी मुंबईला जाणार.        २) आपण मुंबईला जाऊ. आ) द्...

मराठी व्याकरण भाग ३

मराठी व्याकरण भाग ३ नमस्कार मित्रानो,  मागच्या भागात आपण संधी व शब्दविचार या बाबत माहिती घेतली आजच्या भागात आपण नाम व त्याचे प्रकार या बाबत जाणून घेऊया.  * नाम- जगातील कोणत्याही दिसणा -या किंवा न दिसणा -या वस्तूला जे नाव ठेवलेले असते , त्याला नाम असे म्हणतात.  उदा. कागद, गाय, चिकू, जॉकी, गंगा, महाबळेश्वर, गोदावरी, राम, मेहनत, चतुरपणा, चपळाई, प्रामाणिक इ.  * नामाचे मुख्य ३ प्रकार आहेत.  १) सामान्यनाम  २) विशेषनाम  ३) भाववाचक नाम  १) सामान्यनाम- ज्या नामाने एकाच प्रकारच्या एकाच जातीच्या समान  गुणधर्मामुळे त्या वस्तूचा किंवा प्राण्याचा किंवा पदार्थाचा बोध होतो , त्या नामाला 'सामान्यनाम' असे म्हणतात.  १) दर्शना हुशार मुलगी आहे.  २) गंगा पवित्र नदी आहे.  ३) ठाणे प्रसिदध शहर आहे.  वरील वाक्यात 'मुलगी' हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही मुलीला लागू पडतो . तसेच 'नदी' हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही नदीला लागू पडतो. आणि 'शहर' हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही शहराला लागू पडतो . अशा प्रकार...

मराठी व्याकरण भाग २

मराठी व्याकरण भाग २ नमस्कार मित्रानो, मागच्या भागात आपण वर्णविचार व त्याचे प्रकार बघितलेत, आजच्या भागात आपण संधी  व त्याचे प्रकार तसेच शब्दविचार या बाबत माहिती घेणार आहोत.  * संधी- आपण बोलताना अनेक शब्द एकापुढे एक असे उच्चारतो, त्यावेळी एकमेकांशेजारी येणारे दोन वर्ण एकमेकांत मिसळतात. त्याचा जोडशब्द तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र होणा-या प्रकारास संधी असे म्हणतात.  उदा. या वर्गात विद्यार्थी किती? या वाक्यात वर्ग+आत तसेच विद्या+अर्थी असे शब्द एकत्र येऊन वर्गात, विद्यार्थी हे शब्द उच्चारले जातात. वर्ग मधल्या अंत्य 'अ' मध्ये 'आत' मधल्या आद्य (पहिला वर्ण ) 'आ' मिसळून एकत्रित वर्णोच्चार होतो. एका पुढे एक येणारे जवळ जवळचे वर्ण एकमेकात मिसळून जाण्याच्या या प्राक्रियेला संधी असे म्हणतात. एका पाठोपाठ एक आलेले दोन वर्ण एकत्र होण्याच्या प्रकाराला संधी असे म्हणतात.  संधीचे तीन प्रकार आहेत.  १) स्वरसंधी- जेव्हा एकापाठोपाठ येणारे दोन स्वर एकत्र मिळतात ; तेव्हा त्या संधीला स्वरसंधी असे म्हणतात. (स्वर+स्वर ) उदा. सूर्य+अस...