मराठी व्याकरण भाग ६
मराठी व्याकरण भाग ६
* क्रियापद -
वाक्याचा अर्थ पूर्ण करणा -या 'क्रियावाचक शब्दाला' क्रियापद असे म्हणतात. म्हणून 'करतो', 'शिकते', 'खेळतात', ही क्रियापदे आहेत. क्रिया करणार कर्ता असतो व ज्याच्यावर क्रिया घडली त्याला कर्म असे म्हणतात.
उदा. दर्शन अभ्यास करतो
वरील वाक्यात (करतो ) म्हणजे करण्याची क्रिया व्यक्त करण्यात आली आहे.
* धातुसाधिते- धातुला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणा -या शब्दांना 'धातुसाधिते' किवा 'कृदन्ते' असे म्हणतात.
उदा.
१) ती पुस्तक वाचताना अचानक थांबली.
२) तो खेळतांना हसला.
वरील वाक़्यामध्ये 'खेळताना', 'वाचताना' ही धातुपासून तयार झालेली रुपे त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही, म्हणून त्याना क्रियापद म्हणत नसून धातुसाधिते म्हणतात.
* क्रियापदाचे प्रकार पुढील प्रमाणे -
सकर्मक क्रियापद- वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ज्या क्रियापदाला कर्माची गरज लागते, त्या क्रियापदाला 'सकर्मक क्रियापद' असे म्हणतात.
उदा . कर्ता +कर्म +क्रियापद
१) सूरज आंबा खातो.
२) जानवी पूरी खाते.
अकर्मक क्रियापद- वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ज्या क्रियापदाला कर्माची गरज लागत नाही, त्याला 'अकर्मक क्रियापद' असे म्हणतात.
उदा. कर्ता +क्रियापद
१) सूरज लिहितो.
२) जानवी गाते.
उभयविध क्रियापद - जे क्रियापद सकर्मक व अकर्मक दोन्ही प्रकारे वापरता येते त्याला उभयविध क्रियापद असे म्हणतात.
उदा.
१) माझे पुस्तक हरविले.
२) सुरजने माझे पुस्तक हरविले.
वरील दोन्ही वाक्यात 'हरविले' हे क्रियापद आहे, पण पहिल्या वाक्यात पुस्तक हा कर्ता असून दूस-या वाक्यात सुरजने हां कर्ता आहे व 'पुस्तक' हे कर्म आहे. म्हणजेच हरविले हे क्रियापद दोन्ही वाक्यांमध्ये अकर्मक व सकर्मक किवा कर्माशिवाय दोन्ही प्रकार वापरले जाते.
अपूर्ण क्रियापद- अकर्मक क्रियापद असताना ज्याठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही त्याठिकाणी विधान पुरकाची आवश्यकता असते. अशा क्रियापदाना अपूर्ण विधान क्रियापद असे म्हणतात.
उदा. जानवी यंदा शिक्षिका झाली.
वरील वाक़्यामध्ये जानवी ही कर्ता आहे. परंतु, या वाक़्यामध्ये कर्म नाही वरील वाक़्यामधून शिक्षिका हां शब्द काढला तर जानवी यंदा झाली, या शब्दापासून काही अर्थबोध होत नाही. थोडक्यात, वाक्यातील 'झाली' हे क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास असमर्थ आहे, त्यामुळेच वरील वाक्यात 'शिक्षिका' हां शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास पूरक ठरतो, अर्थात आवश्यक ठरतो. अशा विधानपुरक आवश्यकता असणा -या क्रियापदाला अपूर्ण विधान क्रियापद असे म्हणतात.
द्विकर्मक क्रियापद- कधी-कधी वाक्यामध्ये कर्त्यापासून
निघालेल्या दोन क्रिया दोन कर्मावर परिणाम करतात किवा वाक्यातील क्रिया पूर्ण
करण्यासाठी कर्माची आवश्यकता असते, तेव्हा त्याला द्विकर्मक क्रियापद असे म्हणतात.
उदा. त्याने भिका-याला पैसे
दिले.
वरील वाक्यामध्ये त्याने हा
कर्ता असून देण्याची क्रिया हि भिकारी व पैसा या दोन गोष्टींवर अवलंबून आहे.
त्यामुळे वाक्यामध्ये दोन कर्म असून संबंधित वाक्यातील क्रियापद द्विकर्मक
क्रियापद असे म्हणतात.
प्रयोजक क्रियापद- जेव्हा
वाक्यातील क्रियापदाचा कर्ता ती क्रिया स्वतः करीत नसून दुस-या कोणाच्या तरी
प्रेरणेने करतो किवा कर्त्याला दुसरा कोणीतरी ती क्रिया करण्यास प्रेरित करतो असा
अर्थ व्यक्त होत असेल तर त्या क्रियापदाला प्रयोजक क्रियापद असे म्हणतात.
उदा. सुरज मित्राला
शिकवितो.
वरील वाक्यात 'शिकवितो' या
क्रीयापदामधून मित्राला शिकण्याची क्रिया करण्यासाठी सुरज प्रयत्न करतो असा अर्थ
वरील वाक्यामध्ये अभिप्रेत आहे. थोडक्यात सुरज कडून जी क्रिया घडविण्यात येते
त्यालाच प्रयोजक क्रियापद असे म्हणतात.
संयुक्त क्रियापद- वाक्याचा
अर्थ पूर्ण करण्यासाठी जे क्रियापद धातुसाधीताला सहकार्य करते, त्या क्रियापदाला
संयुक्त किवा सहाय्यक क्रियापद असे म्हणतात.
उदा. मुले मैदानावर खेळू
लागली.
वरील वाक्यामध्ये 'खेळ' हि
क्रिया दर्शविली असली तर 'खेळण्याची' यातून क्रिया पूर्ण झालेली दिसत नाही. म्हणून
मैदानावर खेळण्याची क्रिया पूर्ण करायची असेल तर खेळ या शब्दधातुला लागली या
शब्दाचे सहाय्यक क्रियापद असणे आवश्यक आहे. थोडक्यात क्रियापद धातुसाधित व सहाय्यक
या दोन शब्दाच्या संयोगाने तयार झालेली असून अशा क्रियापदाला संयुक्त क्रियापद असे
म्हणतात.
अनियमित क्रियापद- जेव्हा
वाक्यामध्ये क्रियापदाचा मुळ धातू उपलब्ध नसतो तेव्हा अशा वाक्यातील क्रियापदाला
अनियमित किवा गौण असे म्हणतात.
मराठी भाषेत असे काही धातू
आहेत कि, ज्यांना काळाची किवा अर्थाचे प्रत्यय न लावता ते वेगवेगळ्या प्रकारे बोलले
जातात. त्याना अनियमित क्रियापद असे म्हणतात.
उदा. १) देव सगळीकडे आहे.
२) मुलांनी खोटे बोलू नये.
३) मला जेवण पाहिजे.
वरील वाक्यामध्ये आहे, नये,
पाहिजे हि क्रियापदे आहेत, परंतु, वाक्यात मूळ धातू उपलब्ध नाही, म्हणून अशा
क्रियापदांना अनियमित क्रियापद असे म्हणतात.
शक्य क्रियापद- वाक्यामधील
ज्या क्रीयापदाद्वारे कर्त्याची क्रिया करण्याचे सामर्थ्य व्यक्त होते किवा
कर्त्याकडून ती क्रिया करण्याची शक्यता व्यक्त होते, त्या क्रियापदाला शक्य
क्रियापद असे म्हणतात.
उदा. १) मला आता अभ्यास
करवते.
२) माझ्याकडून आता चालवते.
वरील वाक्यामध्ये करवते,
चालवते या क्रीयापदामुळे कर्त्याची क्रिया करण्याची शक्यता दिसून येते, म्हणून
त्याना शक्य क्रियापदे म्हणतात.
भावकर्तुक क्रियापद-
क्रियापद म्हटले कि, त्या शब्दामध्ये कोणती तरी क्रिया अंतर्भूत असते आणि हि
क्रिया करण्यासाठी कर्ता आवश्यक असतो. अशा काही वाक्यांमध्ये क्रियापदाचा मूळ अर्थ
किवा भाव हा क्रियापदाचा कर्ता मानला जातो. अशा क्रियापदाला भाव कर्तुक क्रियापद
असे म्हणतात.
उदा. १) आज सहा वाजताच उजाडले.
२) ऊन लागल्यामुळे त्याला
मळमळले.
वरील वाक्यामध्ये उजाडले,
मळमळले हि क्रियापदे आहेत, या क्रियापदाने दर्शविलेली क्रिया कोणी घडून आणली याचा
आपणास बोध होत नाही, थोडक्यात वाक्यामध्ये स्वतंत्रपणे कर्ता दिसत नाही, अशा
वाक्यात क्रियापदाचा भाव कर्ता मानला जातो, अशा क्रीयापदाना भाव कर्तुक क्रियापदे
असे म्हणतात.
करण व अकरण रूप क्रियापद- जेव्हा
वाक्यातील विधान हे होकार्थी तर दुस-या वाक्यातील विधाने नकारार्थी असते, अशा
होकारार्थी क्रियापदाला करणरूप क्रियापद तर नकारार्थी क्रियापदाला अकरण रूप
क्रियापद असे म्हणतात.
उदा. १) नेहमी खरे बोलावे.
२) केव्हाही खोटे बोलू नये.
वरील वाक्यामध्ये पहिल्या
वाक्यात होकारार्थी तर दुस-या वाक्यात नकारार्थी क्रियापद दिसते, त्याला करण व अकरण
रूप क्रियापद असे म्हणतात.
साधित क्रियापद- सिद्ध
क्रियापद- जेव्हा नामे, विशेषणे, क्रियापदे व अव्यये इ. प्रत्यय लागून क्रियापदे
तयार होतात व त्यांचा उपयोग वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी केला जातो त्याला
साधित क्रियापदे असे म्हणतात. तर शब्दाच्या मूळ धातूंना प्रत्यय लागून जी
क्रियापदे तयार होतात त्याना सिद्ध क्रियापद असे म्हणतात.
उदा. १) तो माझा पेन
हाताळतो.
२) तो अपघात पाहून माझे
डोळे पाणावले.
वरील वाक्यात हाताळणे व
पाणावले हि क्रियापदे शब्दयोगी अशा विविध जातीचे अव्यय पासून तयार झालेल्या
धातूंना साधित धातू त्यापासून तयार झालेल्या क्रीयापदाना साधित क्रियापदे म्हणतात.
तर उठला, बघतो, जा, खा, ये, कर इ. धातूपासून उठला म्हणजे उठवणे, बघतो म्हणजे बघणे,
खा म्हणजे खाणे, कर म्हणजे करणे इ क्रियापदे तयार होतात, त्यांना क्रियापदे म्हणतात.
मित्रानो कसा वाटला आजचा
भाग हे नक्की कळवा. आता तुम्ही मराठी व्याकरण youtube वर देखील बघू शकता व
त्यावरून शिकू शकतात. त्यासाठी माझ्या youtube channel trytolearnineasy ला भेट द्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा