मराठी व्याकरण भाग ३
मराठी व्याकरण भाग ३ नमस्कार मित्रानो, मागच्या भागात आपण संधी व शब्दविचार या बाबत माहिती घेतली आजच्या भागात आपण नाम व त्याचे प्रकार या बाबत जाणून घेऊया. * नाम- जगातील कोणत्याही दिसणा -या किंवा न दिसणा -या वस्तूला जे नाव ठेवलेले असते , त्याला नाम असे म्हणतात. उदा. कागद, गाय, चिकू, जॉकी, गंगा, महाबळेश्वर, गोदावरी, राम, मेहनत, चतुरपणा, चपळाई, प्रामाणिक इ. * नामाचे मुख्य ३ प्रकार आहेत. १) सामान्यनाम २) विशेषनाम ३) भाववाचक नाम १) सामान्यनाम- ज्या नामाने एकाच प्रकारच्या एकाच जातीच्या समान गुणधर्मामुळे त्या वस्तूचा किंवा प्राण्याचा किंवा पदार्थाचा बोध होतो , त्या नामाला 'सामान्यनाम' असे म्हणतात. १) दर्शना हुशार मुलगी आहे. २) गंगा पवित्र नदी आहे. ३) ठाणे प्रसिदध शहर आहे. वरील वाक्यात 'मुलगी' हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही मुलीला लागू पडतो . तसेच 'नदी' हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही नदीला लागू पडतो. आणि 'शहर' हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही शहराला लागू पडतो . अशा प्रकार...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा