मराठी व्याकरण भाग ३
मराठी व्याकरण भाग ३
नमस्कार मित्रानो,
मागच्या भागात आपण संधी व शब्दविचार या बाबत माहिती घेतली आजच्या भागात आपण नाम व त्याचे प्रकार या बाबत जाणून घेऊया.
* नाम- जगातील कोणत्याही दिसणा -या किंवा न दिसणा -या वस्तूला जे नाव ठेवलेले असते, त्याला नाम असे म्हणतात.
उदा. कागद, गाय, चिकू, जॉकी, गंगा, महाबळेश्वर, गोदावरी, राम, मेहनत, चतुरपणा, चपळाई, प्रामाणिक इ.
* नामाचे मुख्य ३ प्रकार आहेत.
१) सामान्यनाम
२) विशेषनाम
३) भाववाचक नाम
१) सामान्यनाम- ज्या नामाने एकाच प्रकारच्या एकाच जातीच्या समान गुणधर्मामुळे त्या वस्तूचा किंवा प्राण्याचा किंवा पदार्थाचा बोध होतो, त्या नामाला 'सामान्यनाम' असे म्हणतात.
१) दर्शना हुशार मुलगी आहे.
२) गंगा पवित्र नदी आहे.
३) ठाणे प्रसिदध शहर आहे.
वरील वाक्यात 'मुलगी' हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही मुलीला लागू पडतो. तसेच 'नदी' हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही नदीला लागू पडतो. आणि 'शहर' हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही शहराला लागू पडतो. अशा प्रकारे 'मुलगी', 'नदी', 'शहर', हि नावे अशी आहेत कि, ती त्या त्या जातीतील सर्व वस्तुंना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे लागू पडतात.
* सामान्य नामाचे दोन प्रकार पडतात-
अ) पदार्थ वाचक नाम-
जे घटक शक्यतो लिटर, मीटर किंवा कि ग्रॅम मध्ये मोजले जातात/संख्येत मोजले जात नाहित, त्या घटकांच्या नावाला पदार्थ वाचक नाम म्हणतात.
उदा. तांबे, कापड, पीठ, प्लास्टिक, पाणी, सोने इ.
ब) समूह वाचक नाम-
समान गुणधर्म असणा -या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला 'समूहवाचक' नाम म्हणतात.
उदा. जुडी, ढिगारा, गंज इ.
३) विशेषनाम-
एखाद्या नामातून एका विशिष्ट व्यक्तीचा किंवा प्राण्याचा अथवा वस्तूचा बोध होत असेल तर अशा नामास 'विशेषनाम' म्हणतात. ते फक्त एका घटका पुरते मर्यादित असते. विशेषनाम एकवचनी असते. विशेषनाम हे व्यक्तिवाचक असते, विशेषनामाचे अनेकवचन होत नाही. अनेकवचन आल्यास सामान्यनाम समजावे.
उदा. गोदावरी, रमेश, ताजमहाल, सूर्य, चंद्र इ.
विशेष नाम व्यक्तिवाचक असते तर सामान्य नाम जातीवाचक असते.
उदा. वैभव- (व्यक्तिवाचक), मुलगा- (जातीवाचक )
४) भाववाचक नाम-
भाववाचक नाम /धर्मवाचक नाम - ज्याला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही अशा कल्पनेने मानलेल्या गुण, अवस्था व कृती यांच्या नावांना 'भाववाचक' नाम असे म्हणतात. हे घटक वास्तुस्वरूपात येत नाहीत.
उदा. सौंदर्य, मनुष्यत्व, विश्रांती, गर्व इ.
* भाववाचक नामाचे तीन गट पडतात.
अ) स्थितिदर्शक - गरिबी, स्वत्रंत्र
ब) गुणदर्शक- सौंदर्य, प्रामाणिकपणा
क) कृतीदर्शक- चोरी, चळवळ
तर मित्रानो आज आपण नाम व त्याचे प्रकार जाणून घेतले. बघितलात किती सोपे आहे ते, अश्या प्रकारे अगदी सोप्या भाषेत व्याकरण शिकून त्याचा रोज सराव केल्यास व्याकरणात तरबेज होता येते. त्यासाठी आवश्यकता आहे ती सरावाची, तेव्हा तुम्ही समजून घ्या व रोजच्या रोज सराव करा म्हणजे स्पर्धा परीक्षेत तुम्हाला मराठी व्याकरणात पैकीच्या पैकी गुण मिळवता येतील व रोजच्या दैनंदिन जीवनात देखील त्याचा उपयोग होईल.
पुढील भागात आपण सर्वनाम व त्याचे प्रकार शिकुयात. मित्रानो माझा ब्लॉग तुमच्या मित्रांना देखील share करा जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल. तेव्हा तुम्ही subscribe नक्की करा व पुढील भागांचे update मिळवत रहा तसेच share करून त्यांना देखील subscribe करायला सांगा.
चला तर मग शिकत रहा व शिकवत रहा.
पुढील भागात आपण सर्वनाम व त्याचे प्रकार शिकुयात. मित्रानो माझा ब्लॉग तुमच्या मित्रांना देखील share करा जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल. तेव्हा तुम्ही subscribe नक्की करा व पुढील भागांचे update मिळवत रहा तसेच share करून त्यांना देखील subscribe करायला सांगा.
चला तर मग शिकत रहा व शिकवत रहा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा