मराठी व्याकरण भाग २


मराठी व्याकरण भाग २
नमस्कार मित्रानो,

मागच्या भागात आपण वर्णविचार व त्याचे प्रकार बघितलेत, आजच्या भागात आपण संधी  व त्याचे प्रकार तसेच शब्दविचार या बाबत माहिती घेणार आहोत. 

* संधी- आपण बोलताना अनेक शब्द एकापुढे एक असे उच्चारतो, त्यावेळी एकमेकांशेजारी येणारे दोन वर्ण एकमेकांत मिसळतात. त्याचा जोडशब्द तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र होणा-या प्रकारास संधी असे म्हणतात. 

उदा. या वर्गात विद्यार्थी किती?

या वाक्यात वर्ग+आत तसेच विद्या+अर्थी असे शब्द एकत्र येऊन वर्गात, विद्यार्थी हे शब्द उच्चारले जातात. वर्ग मधल्या अंत्य 'अ' मध्ये 'आत' मधल्या आद्य (पहिला वर्ण ) 'आ' मिसळून एकत्रित वर्णोच्चार होतो. एका पुढे एक येणारे जवळ जवळचे वर्ण एकमेकात मिसळून जाण्याच्या या प्राक्रियेला संधी असे म्हणतात. एका पाठोपाठ एक आलेले दोन वर्ण एकत्र होण्याच्या प्रकाराला संधी असे म्हणतात. 

संधीचे तीन प्रकार आहेत. 

१) स्वरसंधी- जेव्हा एकापाठोपाठ येणारे दोन स्वर एकत्र मिळतात; तेव्हा त्या संधीला स्वरसंधी असे म्हणतात. (स्वर+स्वर )
उदा. सूर्य+अस्त = सूर्यास्त 

२) व्यंजनसंधी- एकापाठोपाठ येणा-या  दोन वर्णा पैकी पहिला वर्ण हा जेव्हा व्यंजन असतो व दुसरा वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असतो, तेव्हा त्या संधीला व्यंजनसंधी असे म्हणतात. 
(व्यंजन+स्वर किंवा व्यंजन )
उदा. विपद+काल = विपत्काल 

३) विसर्गसंधी- एकापाठोपाठ येणा-या  दोन वर्णा पैकी पहिला वर्ण हा जेव्हा विसर्ग असतो व दुसरा वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असतो, तेव्हा त्या संधीला विसर्गसंधी असे म्हणतात.
(विसर्ग+स्वर किंवा व्यंजन )
उदा. मन:+रथ = मनोरथ 


तर मित्रानो आपण संधी व संधीचे प्रकार बघितलेत आता आपण शब्दविचार बघणार आहोत. 


* शब्द आणि पद -
तोंडावाटे निघणा-या मुलंध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. हे ध्वनी आपण कागदावर लिहून दाखविताना विशिष्ट चिन्हे दाखवितो, वापरतो. हे ध्वनीच्या चिन्हांना आपण अक्षरे असे म्हणतो. ब, द, क, हि तीन अक्षरे आहेत. हि अक्षरे विशिष्ट क्रमाने आल्यामुळे त्यांना अर्थ प्राप्त झाला आहे, म्हणून 'बदक' हा शब्द तयार झाला. 
एखाद्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण वाक्य असे म्हणतो. 'बदक पाण्यात पोहते' हे वाक्य आहे. या वाक्यात तीन पदे आहेत. 'पद' व 'शब्द' यांत थोडा फरक आहे. 'पाणी' हा शब्द आहे, 'पाण्यात' हे पद आहे. वाक्यात वापरताना शब्दाच्या मूळ स्वरूपात बदल करून त्या शब्दाचे जे रूप तयार होते, त्यास 'पद' असे म्हणतात, पण व्याकरणात पदांना देखील स्थूलमानाने 'शब्द' असे म्हटले जाते. 'स्वातीने' हे पद आहे, यात मूळ शब्द 'स्वाती' आहे. मूळ शब्दाला व्याकरणात 'प्रकृती' असे म्हणतात. 'ने' हा प्रत्यय लागून 'स्वातीने' हे जे रूप तयार झाले त्याला 'विकृती' असे म्हणातात. विकृती म्हणजे शब्दाच्या मूळ रूपाचे बदललेले रूप, यालाच पद  असे म्हणतात. वाक्य हे शब्दाचे किंवा पदांचे बनलेले असते.    

तर मित्रानो आज आपण संधी त्याचे प्रकार व शब्द विचार या बाबत माहिती घेतली. पुढच्या भागात आपण नाम व त्याचे प्रकार या बाबत माहिती घेऊ तेव्हा माझ्या ब्लॉग ला sabscribe नक्की करा जेणेकरून तुम्हाला मराठी व्याकरणाचे सर्व भाग शिकायला मिळतील. माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला व त्याबाबत काही तकार किंवा सूचना असतील तर मला जरूर कळवा. 

शिकत राहा, शिकवत रहा. 

















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी व्याकरण भाग ३

मराठी व्याकरण भाग ६