मराठी व्याकरण
मराठी व्याकरण भाग १
नमस्कार मित्रानो!
आपण या ब्लॉग द्वारे मराठी व्याकरणा विषयी माहिती घेणार आहोत.
आजच्या स्पर्धेच्या काळात मराठी व्याकरणात आपण मागे का पडत आहोत? खरे तर मराठी मिडीयम मधून शिकलेल्या मुलांना मराठी हा विषय इयत्ता १ ली पासून सुरु होते, तरी पण मराठी मुले स्पर्धा परीक्षांत मराठी व्याकरणात चुका करताना दिसतात. याचे खरे कारण मराठी व्याकरणाची घेतलेली भीती. मराठी व्याकरण समजण्यास थोडेसे अवघड मात्र एकदा समजून घेतले तर ते अत्यंत्य सोपे असे आहे. त्याकरिता सर्वप्रथम मराठी व्याकरणात काय आहे हे समजून घेऊ आणि त्यानंतर एक एक विषय घेऊन त्याबाबत सविस्तर माहिती करून घेऊ. चला तर मग तयार आहेत ना?
मराठी व्याकरणात खालील गोष्टी येतात.
१) वर्णविचार
२) संधी
३) शब्दविचार
४) नाम
५) सर्वनाम
६) विशेषण
७) क्रियापद
८) क्रियाविशेषण अव्यय
९) शब्दयोगी अव्यय
१०) उभयान्वयी अव्यय
११) केवल प्रयोगी अव्यय
१२) लिंग विचार
१३) वचन
मित्रानो वरील एक एक विषयावर आपण सविस्तर माहिती वेगवेगळ्या ब्लॉग मध्ये घेऊयात.
आजच्या लेखात आपण 'वर्णविचार' बद्दल जाणून घेऊया.
* वर्णविचाराचे खालील प्रकार आहेत.
१) वर्णविचार
२) स्वर
३) स्वरादी
४) व्यंजन
५) व्यंजनाचे प्रकार
वर्णविचार - वर्ण - बोलतांना निघणा-या मूळ ध्वनीला वर्ण असे म्हणतात. ज्या शब्दांचे पृथक्करण होत नाही त्यास वर्ण म्हणतात. बोलल्यानंतर शब्द हवेत विरून जातात म्हणून लिखित स्वरूपात त्यांना 'ध्वनी चिन्हे' किंवा 'अक्षरे' असे म्हणतात.
मराठी भाषेत एकूण ४८ मूळ वर्ण आहेत.
* वर्णांचे पुढील तीन प्रकार आहेत.
१) स्वर
२) स्वरादी
३) व्यंजने
* स्वर-
१) ज्या वर्णांचा उच्चार दुस-या वर्णांचा म्हणजेच मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता केला जातो त्यांना 'स्वर' असे म्हणतात.
२) या वर्णमालेतील 'अ' पासून 'औ' पर्यंतच्या बारा वर्णांना 'स्वर' असे म्हणतात.
३) स्वरांचा उच्चार करताना आपले तोंड उघडे व पसरलेले असते, म्हणजे स्स्वरोचाराच्या वेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो.
४) स्वर म्हणजे नुसता सूर.
* स्वरांचे प्रकार -
अ ) उच्चारावरून पडणारे दोन प्रकार
१) -ह्र्स्व स्वर - ज्यांचा उच्चार करायला कमी वेळ लागतो त्यांना '-ह्रस्व स्वर' म्हणतात.
उदा. अ, इ, उ, त्रु, ल
२) दीर्घ स्वर - ज्यांचा उच्चार करायला जास्त वेळ लागतो त्यांना 'दीर्घ स्वर' म्हणतात.
उदा. आ, ई, ऊ
ब) उच्चारावरून पडणारे प्रकार-
१) सजातीय स्वर- एकाच उच्चारस्थानावरून उच्चारले जाणारे वर्ण.
उदा. अ-आ, इ-ई, उ-ऊ
२) विजातीय स्वर- भिन्न उच्चारस्थानावरून उच्चारले जाणारे वर्ण.
उदा. अ-इ, आ-ए, इ-ऊ, अ-औ
* स्वरादी-
१) ज्या वर्णाच्या उच्चारा आधी स्वरांचा उच्चार करावा लागतो, त्यांना 'स्वरादी' असे म्हणतात.
उदा. अं व अ:
२) अं व अ: या दोन वर्णांना स्वरादी असे म्हणतात.
३) यात अनुस्वार (._) व विसर्ग (:) असे दोन उच्चार आहेत.
४) अनुस्वार व विसर्ग याचा उच्चार करताना या वर्णाच्या अगोदर स्वर येतो म्हणून त्यांना 'स्वरादी' असे म्हणतात.
* व्यंजन- ज्या वर्णाचा उच्चार स्वराचे साह्य घेऊन होतो त्यास 'व्यंजन' असे म्हणतात.
१) मराठी वर्णमालेतील 'क, ख.... पासून ह, ळ' पर्यंतचे वर्ण व्यंजने आहेत.
२) व्यंजने अपूर्ण उच्चारांची आहेत हे दाखवण्यासाठी त्यांचा पाय मोडून लिहितात.
३) आपण जेव्हा की, ख, ग असा उच्चार करतो तेव्हा त्यात 'अ' हा स्वर मिसळून आपण त्याचा उच्चार करतो.
४) उदा. क + अ = क
* व्यंजनाचे प्रकार -
१) उच्चारावरून पडणारे प्रकार
अ ) कठोर- जे वर्ण उच्चारायला कठीण असतात, त्यांना कठोर वर्ण असे म्हणतात.
उदा. क, ख, च, छ, ट, ठ, ज्ञ, थ, प, फ, श, ष, स, .
ब) मृदू- ज्या व्यंजनांचा उच्चार हळुवार असतो किंवा नाजूक असतो त्यांना मृदू वर्ण असे म्हणतात.
उदा. ग, घ, ड, ज, झ, त्र, इ, ढ, ण, द, ध, न, ब, भ, म, य, र, ल, व, ह, आणि ळ .
२) उच्चार स्थानावरून पडणारे प्रकार-
अ) तालव्य- जेव्हा च, छ, ज, आणि झ वर्गातील वर्णास 'य' हा वर्ण लागून उच्चार होत असेल तर त्याचा समावेश तालव्य गटात होतो.
उदा. चित्र, छत्री, जेवण, झेल.
ब) दंत तालव्य - जेव्हा च, ज, झ, वर्णास 'अ' हा वर्ण लागून त्याचा उच्चार होत असेल तर त्याचा समावेश दंत तालव्य गटात होतो.
उदा. चटकन, चोर, जहाज, जमाव, झरा, झाड.
मित्रानो आज आपण वर्ण विचार व त्यातील घटक बघितलेत. पुढच्या भागात आपण संधी बद्दल शिकुयात. मी माझ्या ब्लॉगद्वारे मराठी व्याकरण कमीत कमी शब्दात व सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न केलाय मराठी भाषेत असल्याने यात टाईप करताना चुका झाल्या असतील तर त्याबद्दल माफ करा व समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला प्रतिक्रिया द्यायची असल्यास कंमेंट द्वारे जरूर कळवा. माझ्या ब्लॉग बद्दल तुमच्या मित्रांना सांगायला विसरू नका जेणेकरून अनेक गरजू मित्रांना याचा फायदा होईल.
शिकत रहा, शिकवत रहा.
जर तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचे असेल तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत इंग्रजी शिकण्यासाठी सर्वोत्तम संधी। ज्यात आपल्याला English Speaking and Personality Development कोर्स करता येतो। अधिक माहितीसाठी आमच्या English Speaking & Personality Development Blogg ला भेट द्या. किंवा https://youtu.be/wz3NRNle0WM वर विडिओ पहा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा