मराठी व्याकरण भाग ४
मराठी व्याकरण भाग ४
नमस्कार मित्रानो,आजच्या भागात आपण सर्वनाम या बाबत माहिती घेणार आहोत.
* सर्वनाम- वाक्यात वारंवार होणारा नामाचा उच्चार टाळण्यासाठी ज्या विकारी शब्दाचा उपयोग केला जातो, त्याला 'सर्वनाम' असे म्हणतात.
मराठीत एकंदर नऊ सर्वनामे आहेत.
तू, मी, तो, हा, आपण, स्वतः, कोण, जो, काय.
सर्वनामाचे मुख्य सहा प्रकार आहेत.
१) पुरुषवाचक सर्वनाम
२) दर्शक सर्वनाम
३) संबंधी सर्वनाम
४) प्रश्नार्थक सर्वनाम
५) सामान्य / अनिश्चित सर्वनाम
६) आत्मवाचक सर्वनाम
१) पुरुषवाचक सर्वनाम-
बोलणा -याच्या किंवा लिहाणा-यांच्या दृष्टीने बोलणारा, ज्याच्याशी बोलायचे तो आणि ज्यांच्याविषयी बोलायचे तो असे तीन भाग पडतात. त्यालाच पुरुष म्हणतात व त्यांच्यासाठी वापरल्या जाणा -या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात.
पुरुषवाचक सर्वनामाचे तीन उपप्रकार पडतात.
पुरुषवाचक सर्वनामाचे उपप्रकार-
अ) प्रथम पुरुष- मी, आम्ही, आपण, स्वतः इ.
उदा. १) मी मुंबईला जाणार.
२) आपण मुंबईला जाऊ.
आ) द्वितीय पुरुष- तो, तुम्ही, आपण, स्वतः इ.
उदा. १) तुम्ही कुठून आलात?
२) तो का आला नाही?
इ) तृतीय पुरुष- तो, ती, त्या, ते, आपण, स्वतः इ.
उदा. १) त्याने मला बोलावले आणि स्वतः मात्र आला नाही.
२) ते सर्वजण तिकडे होते.
२) दर्शक सर्वनाम- दर्शक म्हणजे दाखविणारे, कोणतीही जवळची किंवा दूरची वस्तू दर्शविण्यासाठी दर्शक सर्वनामांचा उपयोग करतात.
उदा. हा, हि, ते, हे, तो, ती
उदा. १) हि माझी बहीण आहे.
२) हा तिचा भाऊ आहे.
३) संबंधी सर्वनाम- वाक्यात पुढे येणा-या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखविणा-या सर्वनामाला संबंधी सर्वनामे असे म्हणातात.
उदा. जो, जे, ज्या, जी.
उदा. जो अभ्यास करतो तो पास होतो.
४) प्रश्नार्थक सर्वनाम- ज्या सर्वनामांचा प्रश्न विचारण्यासाठी वापर होतो, त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे असे म्हणतात.
उदा. कोण, कुणास, काय, कोणी, कोणाला.
उदा. काय हो हि महागाई!
५) सामान्य / अनिश्चित सर्वनाम- वाक्यात येणारे सर्वनाम नेमक्या कोणत्या नामासाठी आले आहे हे सांगता आले नाही कि त्याला सामान्य / अनिश्चित सर्वनाम म्हणतात.
उदा. कोणी कोणास हसू नये.
६) आत्मवाचक सर्वनाम- स्वतःविषयी उल्लेख करताना वापरल्या जाणा-या सर्वनामाला म्हणतात.
उदा. तो आपण होवून माझ्याकडे आला.
तर मित्रानो, सोपे आहे ना? रोज थोडे थोडे समजून घेऊन त्याचा व्यवस्थित अभ्यास केल्यास मराठी व्याकरण तुम्हाला स्पर्धा परीक्षेत अव्वल नंबर मिळवून देऊ शकते.
तेव्हा समजून घ्या व रोजचा सराव चालू ठेवा. पुढच्या भागात विशेषण या प्रकारा बाबत जाणून घेऊया. माझा ब्लॉग आवडल्यास आपली प्रतिक्रिया अवश्य कळवा.
शिकत रहा, शिकवत रहा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा