मराठी व्याकरण भाग ५
मराठी व्याकरण भाग ५
नमस्कार मित्रानो,स्वागत आहे आपले https://trytolearnineasy.blogspot.com/ मध्ये, मागच्या भागात आपण 'सर्वनाम' या प्रकाराबाबत जाणून घेतले आजच्या भागात आपण 'विशेषण' या प्रकारा बाबत माहिती घेणार आहोत.
विशेषण - नामाबद्दल विशेष माहिती सांगणा -या शब्दाला 'विशेषण' ('विशेष्य') असे म्हणतात.
उदा. दर्शना गोड मुलगी आहे.
वरील वाक्यात मुलगी बद्दल विशेष माहिती देण्यात आली आहे.
मुलगी कशी? - गोड (मुलगी या नाम बद्दल विशेष माहिती.)
* विशेषणाचे मुख्य प्रकार पुढील प्रमाणे-
गुण विशेषण - ज्या विशेषणांच्या योगाने नामाचा कोणताही प्रकारचा गुण अथवा विशेष दाखविला जातो, त्यास गुण 'विशेषण' असे म्हणतात.
उदा. अलिबागला मोठे धरण आहे.
वरील वाक्यात 'मोठे' या शब्दाने धरणाचा गुण सांगितला आहे.
संख्या विशेषण- ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दर्शविली जाते, त्यास 'संख्या विशेषण' असे म्हणतात.
उदा. जत्रेला पुष्कळ माणसे आली.
वरील वाक्यात 'पुष्कळ' या शब्दाने माणसांची संख्या दर्शविली आहे.
संख्या विशेषणाचे पाच प्रकार आहेत.
१) गुणवाचक संख्या विशेषण- ज्या विशेषणाचा उपयोग केवळ गणना करण्यासाठी होतो त्यास, 'गणनावाचक संख्या विशेषण' असे म्हणतात.
उदा. भाषा, चाळीस मुले
२) क्रम वाचक संख्या विशेषण- ज्या विशेषणाचा उपयोग वस्तूंचा क्रम दाखाविण्यासाठी केला जातो, त्यास 'क्रम विशेषण' असे म्हणतात.
उदा. तिसरा बंगला, पहिले दुकान
३) आवृत्ती वाचक संख्या विशेषण- ज्या विशेषणाचा उपयोग 'किती वेळा' याचा बोध करण्यासाठी केला जातो, त्यास 'आवृत्ती वाचक संख्या विशेषण' असे म्हणतात.
उदा. पाचपट रक्कम, चौपदरी घडी
४) पृथकवाचक संख्या विशेषण- ज्या विशेषणाचा उपयोग वेगळेपणाचा बोध करण्यासाठी केला जातो, त्यास 'पृथकवाचक संख्या विशेषण' असे म्हणतात.
उदा. एकेक विध्यार्थी, वीस - विसची तुकडी
५) अनिश्चित संख्या विशेषण- जी संख्या विशेषण निश्चित अशी संख्या दाखवत नाही, त्यास 'अनिश्चित संख्या विशेषण' असे म्हणतात.
उदा. काही मुले, थोडी जागा
सर्वनामिक विशेषण- जी विशेषणे सर्वनामांपासून तयार होऊन नामाबद्दल विशेष माहिती सांगतात, त्यांना 'सार्वनामिक विशेषणे' असे म्हणतात.
उदा. मी: माझा, माझी, माझे
तू: तुझा, तुझी, तुझे
उदा. झाडावरचा तो पक्षी गात होता.
नामसाधीत विशेषणे- वाक्यामध्ये नामाचा उपयोग विशेषणासारखा होतो, त्यास 'नामासाधीत विशेषणे' असे म्हणतात.
उदा. तो गाडी विक्रेता आहे.
(गाडी - मूळ नाव, विक्रेता- नामाबद्दल विशेष माहिती)
धातुसाधित विशेषणे- एखाद्या वाक्यामध्ये नामाची विशेषणे हि क्रियापदाच्या मूळ रुपापासून बनलेली असतात, अशा विशेषणाला 'धातुसाधित विशेषणे' असे म्हणतात.
उदा. ती धावणारी मुलगी बघा.
(धावणारा शब्द मुलगा नामाची विशेषण आहे, त्याचे मूळ रूप धाव या क्रियापदाच्या मुळ शब्दापासून तयार झाले आहे. )
अव्ययसाधित विशेषणे- वाक्यामध्ये काही अव्यय लागून जी विशेषणे तयार झालेली असतात, त्याला 'अव्ययसाधित विशेषणे' असे म्हणतात.
उदा. समोरची खिडकी बंद आहे.
(समोर या शब्दाला ची हा प्रत्यय लागला आहे )
तर मित्रानो, कसा वाटला आजचा भाग, मी कमीत कमी शब्दांमध्ये तुम्हाला माहिती करून देत आहे, तुम्ही हे समजून घेऊन त्याचा जास्तीत जास्त सराव केल्यास तुमचे मराठी व्याकरण पक्कं तर होईलच पण तुम्हाला त्याचा स्पर्धा परीक्षेमध्ये व दैनंदिन जीवनात जास्त फायदा होईल.
तेव्हा दररोज जास्तीत जास्त सराव हा एकमेव मार्ग आहे. पुढच्या भागात 'क्रियापद', त्याचे प्रकार व त्याबाबत अधिक माहिती घेऊ.
माझा ब्लॉग तुमच्या मित्रांना share नक्की करा, जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल.
शिकत रहा, शिकवत रहा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा