जात पडताळणी प्रमाणपत्र Caste Verification Certificate

 नमस्कार मित्रांनो!

आज मी आपणांस जात पडताळणी प्रमाणपत्रा बद्दल माहिती देणार आहे. यात आपण जात पडताळणी प्रमाणपत्र म्हणजे काय? जात पडताळणी केव्हा करायची असते, कोणाला करता येते व त्याकरीता कोणते कागदपत्रे आवश्यक असतात याबद्दल माहिती बघणार आहोत.

जात पडताळणी काय असते?

महाराष्ट्रात ओपन, ओबिसी, एस.सी., एस.टी., एन.टी, व्ही. जे. एन.टी, एस.बी.सी. अश्या प्रकारे जातींची वर्गवारी करण्यात आलेली आहे. 

ओपन (खुला प्रवर्ग) - वर्गवारीत ब्राह्मण, मराठा, जैन, मारवाडी, मुस्लीम (यातील काहि जाती या ओबिसी वर्गवारीत मोडतात तर काहि मायनारिटी मध्ये मोडतात)

ओबिसी (इतर मागास वर्ग)- वर्गवारीत कुणबी, माळी, धोबी (परिट), वाणी,  व इतर जातींचा समावेश होतो. 

एन.टी - वर्गवारी मध्ये वंजारी, धनगर या जातीचा समावेश असतो. 

व्ही.जे.एन.टी- मध्ये वडारी या जातीचा समावेश होतो. 

एस.सी. (अनुसुचित जाती)- वर्गवारीत महार, मातंग, चांभार इ. जातीचा समावेश असतो. 

एस.टी (अनुसुचित जमाती)- मध्ये आदिवासी जातींचा समावेश असतो. 

एस.बी.सी. (विशेष मागास प्रवर्ग)- वर्गवारीत पद्मशाली, कोष्टी व तत्सम जातीचा समावेश असतो.

या सर्व प्रगर्वातील लोकांना शिक्षण, नोकरी व निवडणूक या करीता राखीव कोट्यातुन अथवा शिक्षणाकरीता शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्याकरीता जातीच्या दाखल्याची आवश्यकता असते. आपण ज्या जातीच्या दाखल्याच्या आधारे लाभ घेत असतो व आपल्या जातीच्या दाखल्यावर नमुद जातीची पडताळणी म्हणजेच जात पडताळणी.

शिक्षणाकरीता बारावी (सायन्स), डिप्लोमा, इंजिनियरीग, नर्सिंग, उच्च शिक्षण या करीता तर शासकिय नोकरी राखीव कोट्यातुन मिळाल्यास व निवडणूक राखीव जागांवर लढल्यास आपल्याला जात पडताळणी करणे आवश्यक असते.

आवश्यक कागदपत्रे -

एस.सी. व एस.टी करीता इ.सन 1950 पुर्वीचे पुरावे आवश्यक असतात.

एन.टी, व्ही.जे.एन.टी व एस.बी.सी. करीता इ.सन 1961 पुर्वीचे पुरावे आवश्यक असतात.

ओ.बि.सी करीता इ.सन 1967 पुर्वीचे पुरावे आवश्यक असतात.

तर पुरावे म्हणजे काय तर काही महत्वाची शासकिय कागदपत्रे ज्यावर जातीचा उल्लेख आवश्यक असतो. जसे शाळा सोडल्याचा दाखला. यावर त्या व्यक्तीचे नाव, जन्मतारीख व जातीचे नाव इ. उल्लेख असतो.

उदा. उमेदवाराचे पंजोबा यांचा शाळेचा दाखला उपलब्ध आहे व त्यांचा जन्म इ.सन 1 जुन 1945 असा आहे व त्यावर जातीचा उल्लेख हिंदू-महार असा आहे तर तो एस.सी. प्रवर्गा करीताचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतो. 

तसेच उमेदवाराचे आजोबा यांचा शाळेचा दाखला उपलब्ध आहे व त्यांचा जन्म इ.सन 1 जुन 1952 असा आहे व त्यावर जातीचा उल्लेख हिंदू-वंजारी असा आहे तर तो एन.टी. प्रवर्गा करीताचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतो.  

किंवा उमेदवाराचे वडील यांचा शाळेचा दाखला उपलब्ध आहे व त्यांचा जन्म इ.सन 1 जुन 1960 असा आहे व त्यावर जातीचा उल्लेख हिंदू-माळी असा आहे तर तो ओ.बि.सी. प्रवर्गा करीताचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतो. 

याव्यतिरीक्त महसुली पुरावे जसे गाव नमुना 14, इ.सन 1951 सालचे कोतवाल रजिस्टर, खरेदी खत, फेरफार, सातबारा इ. कागदपत्रे पुरावे म्हणून सादर करु शकतो.

सविस्तर कागदपत्रे-

1) शिक्षणाकरीता- अर्जदार (विद्यार्थी)- १) शाळेचा दाखला, २) जातीचा दाखला, ३) बोनाफाईड प्रमाणपत्र, ४) नमुना 15 चा अर्ज, ५) विद्यालय किंवा महाविद्यालयाचे शिफारस पत्र, ६) आधार कार्ड, ७) फोटो व सही

वडील, आजोबा, पंजोबा, चुलते, आत्या इत्यादी पैकी आवश्यकतेनुसार - शाळेचे दाखले,  गाव नमुना 14, इ.सन 1951 सालचे कोतवाल रजिस्टर, खरेदी खत, फेरफार, सातबारा पैकी उपलब्ध कागदपत्रे व पालकांची सही.

2) नोकरी विषयक- अर्जदार - १) शाळेचा दाखला, २) जातीचा दाखला, 3) नमुना 15 चा अर्ज, ४) नियुक्ती प्रमाणपत्र, ५) नियोक्त्याचे शिफारस पत्र, ६) आधार कार्ड, ७) फोटो व सही

वडील, आजोबा, पंजोबा, चुलते, आत्या इत्यादी पैकी आवश्यकतेनुसार - शाळेचे दाखले,  गाव नमुना 14, इ.सन 1951 सालचे कोतवाल रजिस्टर, खरेदी खत, फेरफार, सातबारा पैकी उपलब्ध कागदपत्रे. 

3) निवडणूक करीता- अर्जदार - १) शाळेचा दाखला, २) जातीचा दाखला, 3) नमुना 15 चा अर्ज, ६) आधार कार्ड, ७) फोटो व सही

वडील, आजोबा, पंजोबा, चुलते, आत्या इत्यादी पैकी आवश्यकतेनुसार - शाळेचे दाखले,  गाव नमुना 14, इ.सन 1951 सालचे कोतवाल रजिस्टर, खरेदी खत, फेरफार, सातबारा पैकी उपलब्ध कागदपत्रे.  

वरील सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतर नमुना ३ व नमुना १७ चे शपथपत्र करावे लागते व जात पडताळणी समितीच्या संकेतस्थळावर अर्ज सादर केल्यानंतर व सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतात, त्यानंतर जात पडताळणी करीता आवश्यक असलेली फी (विद्यार्थी -१००, व नोकरी व निवडणूक करीता- ५००) भरल्यानंतर भरलेल्या अर्जाची प्रत फी भरल्याची पावती व सर्व कागदपत्रे आपल्या जिल्ह्याच्या पडताळणी समिती कडे सादर करावी. अर्ज सादर केल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करण्यात येऊन साधारन १ ते 2 महिन्यात आपल्याला जात पडताळणी प्रमाणपत्र ई-मेल वर मिळते.

तर मित्रांनो आपल्याला वरील माहिती कशी वाटली हे नक्की कळवा. आपण माझी वेबसाईट वर जाऊन आपला अभिप्राय नोंदवु शकतात. 

Website link -

trushnadigitalservices.in


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी व्याकरण भाग ३

मराठी व्याकरण भाग ६

मराठी व्याकरण भाग २