मराठी व्याकरण भाग ६
मराठी व्याकरण भाग ६ * क्रियापद - वाक्याचा अर्थ पूर्ण करणा -या 'क्रियावाचक शब्दाला' क्रियापद असे म्हणतात. म्हणून 'करतो', 'शिकते', 'खेळतात', ही क्रियापदे आहेत. क्रिया करणार कर्ता असतो व ज्याच्यावर क्रिया घडली त्याला कर्म असे म्हणतात. उदा. दर्शन अभ्यास करतो वरील वाक्यात (करतो ) म्हणजे करण्याची क्रिया व्यक्त करण्यात आली आहे. * धातुसाधिते- धातुला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणा -या शब्दांना 'धातुसाधिते' किवा 'कृदन्ते' असे म्हणतात. उदा. १) ती पुस्तक वाचताना अचानक थांबली. २) तो खेळतांना हसला. वरील वाक़्यामध्ये 'खेळताना', 'वाचताना' ही धातुपासून तयार झालेली रुपे त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही, म्हणून त्याना क्रियापद म्हणत नसून धातुसाधिते म्हणतात. * क्रियापदाचे प्रकार पुढील प्रमाणे - सकर्मक क्रियापद- वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ज्या क्रियापदाला कर्माची गरज लागते, त्या क्रियापदाला 'सकर्मक क्रियापद' असे म्हणतात. उदा . कर्ता +कर्म +क्रियापद...