पोस्ट्स

मे, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मराठी व्याकरण भाग ३

मराठी व्याकरण भाग ३ नमस्कार मित्रानो,  मागच्या भागात आपण संधी व शब्दविचार या बाबत माहिती घेतली आजच्या भागात आपण नाम व त्याचे प्रकार या बाबत जाणून घेऊया.  * नाम- जगातील कोणत्याही दिसणा -या किंवा न दिसणा -या वस्तूला जे नाव ठेवलेले असते , त्याला नाम असे म्हणतात.  उदा. कागद, गाय, चिकू, जॉकी, गंगा, महाबळेश्वर, गोदावरी, राम, मेहनत, चतुरपणा, चपळाई, प्रामाणिक इ.  * नामाचे मुख्य ३ प्रकार आहेत.  १) सामान्यनाम  २) विशेषनाम  ३) भाववाचक नाम  १) सामान्यनाम- ज्या नामाने एकाच प्रकारच्या एकाच जातीच्या समान  गुणधर्मामुळे त्या वस्तूचा किंवा प्राण्याचा किंवा पदार्थाचा बोध होतो , त्या नामाला 'सामान्यनाम' असे म्हणतात.  १) दर्शना हुशार मुलगी आहे.  २) गंगा पवित्र नदी आहे.  ३) ठाणे प्रसिदध शहर आहे.  वरील वाक्यात 'मुलगी' हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही मुलीला लागू पडतो . तसेच 'नदी' हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही नदीला लागू पडतो. आणि 'शहर' हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही शहराला लागू पडतो . अशा प्रकार...

मराठी व्याकरण भाग २

मराठी व्याकरण भाग २ नमस्कार मित्रानो, मागच्या भागात आपण वर्णविचार व त्याचे प्रकार बघितलेत, आजच्या भागात आपण संधी  व त्याचे प्रकार तसेच शब्दविचार या बाबत माहिती घेणार आहोत.  * संधी- आपण बोलताना अनेक शब्द एकापुढे एक असे उच्चारतो, त्यावेळी एकमेकांशेजारी येणारे दोन वर्ण एकमेकांत मिसळतात. त्याचा जोडशब्द तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र होणा-या प्रकारास संधी असे म्हणतात.  उदा. या वर्गात विद्यार्थी किती? या वाक्यात वर्ग+आत तसेच विद्या+अर्थी असे शब्द एकत्र येऊन वर्गात, विद्यार्थी हे शब्द उच्चारले जातात. वर्ग मधल्या अंत्य 'अ' मध्ये 'आत' मधल्या आद्य (पहिला वर्ण ) 'आ' मिसळून एकत्रित वर्णोच्चार होतो. एका पुढे एक येणारे जवळ जवळचे वर्ण एकमेकात मिसळून जाण्याच्या या प्राक्रियेला संधी असे म्हणतात. एका पाठोपाठ एक आलेले दोन वर्ण एकत्र होण्याच्या प्रकाराला संधी असे म्हणतात.  संधीचे तीन प्रकार आहेत.  १) स्वरसंधी- जेव्हा एकापाठोपाठ येणारे दोन स्वर एकत्र मिळतात ; तेव्हा त्या संधीला स्वरसंधी असे म्हणतात. (स्वर+स्वर ) उदा. सूर्य+अस...